सरकारनामा ब्यूरो
आज (२७ डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधान भवन परिसरात टाळांचा आवाजात, विरोधकांनी फुगडी खेळत, भजन आंदोलन केले.
भूखंड घ्या...कुणी गायरान घ्या! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
घटनाबाह्य सरकारच्या गद्दार गटातल्या मंत्र्यांचे घोटाळे आणि गैरव्यवहार लोकांसमोर येत आहेत.
'मविआ' च्या आमदारांनी भजन आंदोलन करून सरकारची कानउघडणी केली.
विरोधी पक्षातील आमदार भजन आंदोलनात सहभागी झाले.
सरकारमधील विविध मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शने, घोषणाबाजी करण्यात आली.
"दिडशे कोटींची गायरान जमीन लुटणारे...मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा द्या"...असे पोस्टर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील आमदारांनी झळकवले.
'खोक्याने लुटा, कधी खोऱ्याने लुटा'...अशा घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून निघाला.