सरकारनामा ब्यूरो
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे.
विरोधक विविध प्रश्नांवरुन आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करत आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर चूल मांडली.
यावेळी प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून, गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला.
'या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय', 'खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..' अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार उपस्थित होते.
निदर्शने करत सरकारवर निशाणा साधला.