Nirmala Sitaraman : लंडनमध्ये सेल्सगर्ल'ची नोकरी ते भारताच्या अर्थमंत्री, असा आहे निर्मला सीतारामन यांचा प्रवास?

Rashmi Mane

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज (1 फेब्रुवारी) सलग पाचव्यांदा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

18 ऑगस्ट 1959 रोजी तामिळनाडूच्या मदुराई येथे एका ब्राह्मण कुटुंबात निर्मला सीतारामन यांचा जन्म झाला.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

त्यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

लग्नानंतर त्या लंडनमध्ये शिफ्ट झाल्या. याठिकाणी त्यांनी एका स्टोरमध्ये सेल्सगर्ल म्हणूनही काम केले होते. तसेच लंडनमधील प्राईस वॉटर हाउस मध्यही त्यांनी मॅनेजर पदावर त्यांनी काम पाहिले.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

2006 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन राजकीय कारर्किदीला सुरुवात केली

Nirmala Sitaraman | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री पद भुषवले.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

त्यानंतर त्यांच्याकडे पूर्णवेळ संरक्षण मंत्रालयाचा कारभार देण्यात आला. विशेष म्हणजे देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान त्यांना मिळवला.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

1970-71 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात अर्थ खाते स्वत:कडे ठेवले होते. त्या पुर्णवेळ महिला अर्थमंत्री नव्हत्या.

Nirmala Sitaraman | Sarkarnama

पण निर्मला सीतारामन या खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या.

Nirmala Sitaraman | Sarkarnama