Nikki Haley : भारतीय वंशाच्या 'निक्की हॅली' लढवणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक

सरकारनामा ब्यूरो

भारतीय वंशाच्या रिपब्लिक नेत्या निक्की हॅली यांनी मंगळवारी (14 फेब्रुवारी) अमेरिकेत 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 

Nikki Haley | Sarkarnama

या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार आहेत.

Nikki Haley | Sarkarnama

डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

Nikki Haley, Donald Trump | Sarkarnama

निक्की हॅले या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील अमृतसर आहे.

Nikki Haley | Sarkarnama

निक्की हॅले यांचे पुर्ण नाव 'निम्रता निक्की रंधावा हेली' असे आहे. त्यांचे आई- वडील अमृतसरहून स्थलांतरित होऊन अमेरिकेत स्थायिक झाले होते.

Nikki Haley | Sarkarnama

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा दावा त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मांडला आहे.

Nikki Haley | Sarkarnama

हॅली या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या माजी राजदूत राहिल्या आहेत.

Nikki Haley | Sarkarnama

अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Nikki Haley | Sarkarnama