बिल गेट्स यांच्या मुलीनं घोडेस्वारांसोबत लग्न केलं ; जाणून घ्या, नायल नासर कोण आहे ?

Mangesh Mahale

जेनिफरने 30 वर्षीय घोडेस्वार नायल नासर सोबत लग्न केलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. जेनिफर आणि नासर यांच्या लग्नानंतर शनिवारी दुपारी न्यूयॉर्कमध्ये रिसेप्शन पार्टीही देण्यात आली.

नासर आणि जेनिफर 2017 मध्ये आपल्या नात्याबाबत जगाला सांगितलं होतं. नासर हा एक उत्तम घोडेस्वार आहे. या घोडेस्वारीमुळेच आम्ही दोघं जवळ आलो असं जेनिफर आणि नासर यांनी सांगितलं होतं.

जगातल्या सर्वात श्रीमंत घराण्याचा जावई नायल नासर हा इजिप्तचा आहे. तो सध्या शिकागोमध्ये वास्तव्य करतो मात्र त्याचे आई वडील इजिप्तमध्ये वास्तव्य करतात.

नासरचा सुरूवातीचा काळ कुवैतमध्ये गेला. कुवैतमध्ये त्याच्या आई वडिलांची आर्किटेक्चर आणि डिझाईन फर्म आहे. नायल नासरला एक बाऊ आहे त्याचं नाव शराफ आहे.

नायल नासर हा इजिप्तमधला एक प्रसिद्ध घोडेस्वार आहे. अनेक मोठ्या घोडेस्वारी स्पर्धेत त्याने भाग घेतला आहे. FEI च्या विश्व चषक फायनलसाठी क्वालिफायही केलं होतं.

इंग्लिश, फ्रेंच आणि अरबी भाषा बोलणारा नायल स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर झाला आहे. जेनिफरही याच विद्यापीठात शिकत होती. जेनिफरने बायोलॉजी हा विषय घेऊन पदवीधर झाली आहे.

नायल नासर हा एक व्यावसायिकही आहे. स्टेबल्स LLC ही कंपनीही नायल नासर चावलतो. 2014 मध्ये त्याने ही कंपनी सुरू केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.