'लोहपुरुष' सरदार पटेल यांच्याविषयी प्रेरणादायी गोष्टी

सरकारनामा ब्युरो

सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले गृहमंत्री होते. त्यांचा जन्म ३१ आँक्टोबर १८७५ रोजी गुजरातच्या नडियाद येथे झाला. ते खेडा जिल्ह्यातील झावेर भाई आणि लाडबा पटेल यांचे चैाथे पुत्र. १८९७ मध्ये त्यांची २२ व्या वर्षी मैट्रीकची परीक्षा पास केली. त्याचा विवाह झबेरबा यांच्याशी झाला. पटेल हे ३३ वर्षांचे असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले

अन्याय ते कधीही सहन करीत नव्हते. त्यांच्या शाळेतील शिक्षक पुस्तके विक्री करीत असत. त्याला त्यांनी विरोध केला. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून पुस्तक खरेदी न करण्याचा सल्ला दिला. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संघर्ष झाला. यात पटेल यांचा विजय झाला.

वकील होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी इग्लंड येथे जाण्याची इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे एका ओळखीच्या वकीलांकडून पुस्तके घेऊन त्यांनी घरीच अभ्यास केला.

बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केली. सत्याग्रहाच्या यशस्वी झाल्यावर येथील महिलांनी त्यांनी 'सरदार' ही उपाधी बहाल केली. आपल्याला आजचा एकत्रित भारताचा नकाशा पहायला मिळतो आहे. त्यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे त्यांना भारताचे लोहपुरुष असे संबोधले जाते. ते वर्णभेद, जातीभेदाच्या विरोधात होते.

इंग्लंड येथे वकीली अभ्यास केल्यानंतर पैसे कमावणं हे त्यांचे ध्येय नव्हते. सरदार पटेल १९१३ मध्ये भारतात परत आले. त्यांनी अहमदाबाद येथे आपली वकीली सुरु केली. लवकरच ते प्रसिद्ध वकील झाले. त्यांनी १९१७ मध्ये अहमदाबाद येथे सैनिटेशन कमिश्वरची निवडणुक लढवली, यात ते विजयी झाले.

सरदार पटेल हे महात्मा गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहपासून फारच प्रभावित होते. १९१८ मध्ये गुजरात येथील खेडा परिसरात दुःकाळ पडला होता, ब्रिटीश सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा गांधीजींनी त्यांच्याविरोधात संघर्ष करण्याचे ठरवलं. याचे नेतृत्व करण्यासाठी गांधी एका व्यक्तीच्या शोधात होते. त्यावेळी सरदार पटेल पुढे आले, त्यांनी नेतृत्व केलं. सोमनाथ मंदीराचा त्यांनी जीर्णाद्धार केला. २०१८ पटेल यांच्या जयंती दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण झाले.

सरदार पटेल हे महात्मा गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहपासून फारच प्रभावित होते. १९१८ मध्ये गुजरात येथील खेडा परिसरात दुःकाळ पडला होता, ब्रिटीश सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा गांधीजींनी त्यांच्याविरोधात संघर्ष करण्याचे ठरवलं. याचे नेतृत्व करण्यासाठी गांधी एका व्यक्तीच्या शोधात होते. त्यावेळी सरदार पटेल पुढे आले, त्यांनी नेतृत्व केलं.

गृहमंत्री असताना देशात विखुरलेली संस्थाने भारतात विलीन करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. केवळ हैदराबाद येथे 'ऑपरेशन पोलो' साठी त्यांना लष्कराला पाचारण करावे लागले. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाला यश आले. १५ जुलै १९४७ रोजी संस्थानिकांच्या विभागाची त्यांनी स्थापना केली.

सरदार पटेल हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते पण महात्मा गांधीजींच्या इच्छेच्या मान राखत त्यांनी माघार घेतली. पंडित नेहरु हे पंतप्रधान झाले. पटेल हे उपपंतप्रधान झाले. ते गृहमंत्रीही होते. ४१ व्या वर्षी त्याचे निधन झाले. भारतरत्न या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचे चिंरजीव विपिनभाई पटेल यांनी या सन्मान स्वीकारला. सरदार पटेल यांचे स्वतःचे घर नव्हते. अहमदाबाद येथे ते एका भाड्याच्या घरात राहत होते. १५ डिसेंबर १९५० मध्ये त्यांचे मुंबई निधन झाले तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त २६० रुपये होते.

स्वातंत्र्यापूर्वी जूनागढच्या नवाबांनी १९४७ रोजी पाकिस्तानसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताने त्यांचा हा निर्णय अमान्य करीत त्यांना भारतात विलिन करुन घेतलं. पटेल यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी जूनागढ येथे जाऊन हा परिसर लष्कराच्या ताब्यात घेतला. त्याठिकाणी शांतता प्रस्थापित केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.