National Child Award : पंतप्रधानांच्या हस्ते 11 मुलांचा गौरव, पाहा मुलांची नेत्रदीपक कामगिरी!

सरकारनामा ब्यूरो

यावर्षी 11 बालकांना पंतप्रधान 'राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.

Sarkarnama

तेलंगनाच्या 'एम. गौरी रेड्डी' या एक उत्कृष्ट नृत्यांगना आहेत. 2016 मध्ये, त्यांनी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ डान्समध्ये शास्त्रीय नृत्य सादर केले होते.

Sarkarnama

ओडिशाचे असलेले 'संभ मिश्रा' यांनी प्रसिद्ध प्रकाशनांसाठी अनेक उल्लेखनीय लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. त्यांना प्रतिष्ठित "फेलोशिप ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडन" ने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे 200 वर्षांच्या इतिहासात, सर्वात तरुण विजेते ठरले आहेत.

Sarkarnama

आसाममधील 'श्रेया भट्टाचार्जी' ही एक उत्कृष्ठ तबला वादक आहे, तिचा सर्वाधिक काळ तबला वाजवण्याचा विक्रम 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवले गेला आहे. तबला वादनाच्या कलेसाठी तिला 9 व्या सांस्कृतिक ऑलिम्पियाड तसेच इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Sarkarnama

महाराष्ट्रातील 'रोहन रामचंद्र बहिर' यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारून अतुलनीय शौर्य दाखवले. त्यांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Sarkarnama

दिल्लीच्या 'अनुष्का जॉली' हिने "अँटी-बुलिंग स्क्वाड कवच" नावाचे एक अॅप तयार केले आहे, जे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्या विषयी समुपदेशन तसेच सायबर बुलिंगबद्दल व्हिडिओद्वारे ऑनलाइन शिक्षण देते.

Sarkarnama

आंध्र प्रदेशातील कोलागटला 'अलाना मीनाक्षी' ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. तिने एशियन स्कुल U7 गर्ल्स क्लासिकच्या मानक स्वरूपात सुवर्ण पदक जिंकले आहे. इतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकांसह 'महिला उमेदवार मास्टर ही पदवी मिळाली आहे .

Sarkarnama

छत्तीसगडच्या 'आदित्य प्रताप सिंह चौहान' यांनी "मायक्रोपा" नावाचे अद्वितीय तंत्रज्ञान विकसीत केले आहे. हे संगणक अल्गोरिदम वापरून पिण्याच्या पाण्यातून मायक्रोप्लास्टिक शोधण्यासाठी आणि पाणी फिल्टर करण्यासाठी या तंत्रज्ञान बनवले आहे.

Sarkarnama

शौर्यजित रणजितकुमार खैरे हा गुजरातचा राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांब खेळाडू आहे. गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये, त्यांनी कांस्य पदक जिंकून तो सर्व खेळांमध्ये सर्वात तरुण पदक विजेता ठरला आहे.

Sarkarnama

कर्नाटकातील ऋषी शिव प्रसन्ना हे सर्वात तरुण Android अॅप्लिकेशन डेव्हलपर आहे. ते भारतातील सर्वात तरुण Youtuber आहेत. त्यांनी "Elements of Earth" नावाचे पुस्तक लिहिले आहे.

Sarkarnama

'आदित्य सुरेश 14 वर्षांचा आहे. तो एक उत्कृष्ट गायक असून तो हाडांच्या आजाराने त्रस्त आहे. असे असूनही, त्यांने 500 हून अधिक कार्यक्रमांमध्ये गायन केले आहे.

Sarkarnama

मार्शल आर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेती, जम्मू काश्मिरची 'हनाया निसार' गेल्या 7 वर्षापासून मार्शल आर्ट्स खेळाडू आहे.

Sarkarnama