सरकारनामा ब्यूरो
नागालँडमधील दोन जागांवर रामदास आठवलेंच्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे दोन आमदार निवडून आले आहेत.
नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाला आहे.
पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर रामदास आठवले यांच्या 'आरपीआयचे' आमदार निवडून आले आहेत.
राज्यात एकही आमदार नसणाऱ्या आठवले गटाचे, थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'ने एकूण आठ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते.
नागालँडमध्ये झालेल्या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
'आरपीआय'च्या 'वाय लिमा ओनेन चँग' यांनी नागालँडमधील नोक्सेन येथील जागा जिंकली आहे.
इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर ही जागा जिंकली आहे.