महाराष्ट्र दिन विशेष: मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यावर चपलेचा वर्षाव

अनुराधा धावडे

एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात भाषावार प्रांतरचना करण्याचे ठरले. मात्र मुंबई महराष्ट्रात विलीन करण्याऐवजी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याचा हेतू होता.

मात्र महाराष्ट्रातील अनेक राजकारणी, समाजसेवक, कलाकार, सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्याची मागणी केली आणि ती जोर धरु लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली.

त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. मोरारजी हे मुळचे गुजरातचे. त्यांच्या मते मुंबईला मोठे करण्यामागे गुजरातच्या व्यापाऱ्यांचा मोठा हात होता, असे मोररजी देसाई यांना वाटत होते.

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची मागणी वाढत असताना, मोरारजी देसाई यांनी बोलवलेल्या एका जाहीर सभेत मुंबईचा सम्राट म्हणून ओळख असलेल्या स.का.पाटील यांनी या सभेत, “आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही”, असे चिथावणीखोर भाषण केले. त्यांच्या पाठोपाठ मोरारजी देसाई यांनी देखील त्यांचीच री ओढली. यामुळे लोकांनी संतापून सभा उधळली. दोन्ही नेत्यांवर चपलांचा वर्षाव झाला

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दडपण्यासाठी तत्कालीन सरकारने जमावबंदीचा आदेश दिला. कामगार आझाद मैदानात जमू लागले. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्या दिवशी फ्लोरा फाऊटनवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये १५ जणांनी प्राण गमवावा लागला.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबई ते कोल्हापूर बेळगाव कारवारपर्यंत पसरली होती. जानेवारी १९५६ च्या सुमारास केंद्रसरकारने केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोकांनी रस्त्यावर उतरुन, सत्याग्रह, मोर्चा, हरताळ अशी आंदोलने सुरु झाली. मोरारजी देसाईंनी सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले.

अखेर भारताचे तत्कालीन अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अधिक बळ मिळाले. सर्व बाजूंनी दबाव वाढल्यावर नेहरुंनाही आपली भूमिका बदलून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रास पाठींबा द्यावा लागला आणि अखेर मुंबईसह संयुक्

संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बलिदान देणार्‍यांची संख्या हळूहळू वाढत होती. सुरुवातीला 105 हुतात्मे असल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर काही शहीदांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केलेल्या पाठपुरवठ्यानंतर दोन हुताम्यांना 'शहीद' म्हणून दर्जा देण्यात आला. मुंबईतील 'हुतात्मा चौक' परिसरामध्ये एकूण 107 हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.