PM Modi Big Decisions: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण: नऊ वर्षात घेतले हे ऐतिहासिक निर्णय

Ganesh Thombare

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात 2014 आणि 2019 ला भाजपचं सरकार सत्तेत आलं. आता मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.

नऊ वर्षात अनेक मोठे निर्णय

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला होता.

जीएसटी :

1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी (गूड्स अँड सर्व्हिस टॅक्स) लागू करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला.

कलम 370 रद्द :

मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 (दि.5 ऑगस्ट 2019) हटवण्याचा निर्णय घेतला.

सर्जिकल स्ट्राईक

मोदी सरकारने पहिल्या टर्ममध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक (दि.28 सप्टेंबर 2016) केला होता.

एअर स्ट्राईक

पुलवामामध्ये 2019 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला होता.

तिहेरी तलाक :

मोदी सरकारने तिहेरी तलाकच्या संदर्भातले विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करत मोठा निर्णय घेतला.

Next : अन् एका खोलीतून सुरु झालेला प्रवास सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला...