Modi-Adani Photo's : कधी आणि कसे झाले पंतप्रधान मोदी-अदानी मित्र?

सरकारनामा ब्यूरो

मोदी-अदानी मैत्रीचे मूळ हे 2002 या वर्षातील आहे. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर राज्यात उद्योगीकरणासाठी पोषक वातातरण नव्हतं.

Modi-Adani | Sarkarnama

मोदींनी उद्योगधंद्यांना आकर्षित करण्यासाठी गुजरातमध्ये मेळ्याव्याचं आयोजन केले होते. याकडे सर्व उद्योजकांनी पाठ फिरवली. अशा वेळी अदानी मोदींच्या साहाय्यास धावून आले.

Modi-Adani | Sarkarnama

दंगल उसळलेल्या भागात गुंतवणूक करण्याचा धोका अनेक उद्योजकांनी पत्करला नाही. अशा वेळी मोदींच्या बाजूने अदानी उभे राहिले. अदानी उद्योग समुहाने राज्यात भरीव गुंतवणूक केली.

Modi-Adani | Sarkarnama

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच मुंद्रा बंदर चालवण्याचं कंत्राट अदानींना मिळालं.

Modi-Adani | Sarkarnama

एकूणच उर्जा क्षेत्रातही त्यांचा चांगला जम बसला. एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या औद्योगिक रणनीतीवर अदानी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांची प्रगती होत गेली.

Modi-Adani | Sarkarnama

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर मोदी-अदानी संबंध आणखी दृढ झाले.

Modi-Adani | Sarkarnama

2008 मध्ये अदानी यांचे साम्राज्य 8 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते, ते 2021 मध्ये 78 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले होते. 2014 नंतर अदानी यांची संपत्ती शतपटीने वाढत गेली.

Modi-Adani | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना 'पद्म पुरस्कार' प्रदान ; पाहा खास फोटो!