MLA Jaykumar Gore Accident : जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला?

सरकारनामा ब्यूरो

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदार संघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे.

Jaykumar Gore | Sarkarnama

या अपघातात जयकुमार गोरे यांच्यासह दोन जण जखमी झाले आहेत.

Jaykumar Gore | Sarkarnama

पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यातील फलटणच्या मलठण येथे हा अपघात झाला.

Jaykumar Gore | Sarkarnama

नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी सुमारे 50 फूट खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे.

Jaykumar Gore | Sarkarnama

शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Jaykumar Gore | Sarkarnama

पुण्याहून त्यांच्या दहिवडी गावाकडे जात असताना हा अपघात झाला.

Jaykumar Gore | Sarkarnama

अपघातात जखमी झाल्याने गोरे यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Jaykumar Gore | Sarkarnama

त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाँक्टरांनी गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

Jaykumar Gore | Sarkarnama
Next: Leo Varadkar : आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान ; महाराष्ट्राशी आहे खास नातं!