Chetan Zadpe
मराठा आरक्षणासाठी सोळा दिवसांपासून ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे घेण्यासाठी आवाहन केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर चर्चेसाठी उपस्थित आहेत.
जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण 17 व्या दिवशी सोडलं.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, यासाठी सरकारला एका महिन्याची मुदत सरकारला दिली आहे.
यावेळी मराठा समाजाल ठोस आणि टिकणारं आरक्षण मराठा देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिला.