Manohar Parrikar : आयआयटी इंजिनिअर ते देशाचे संरक्षण मंत्री : पर्रीकरांचा थक्क करणारा प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले मनोहर पर्रीकर यांची आज जयंती आहे.

Manohar Parrikar | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता. मात्र, यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला साधेपणा अखेरच्या श्वासापर्यंत जपला.

Manohar Parrikar | Sarkarnama

पर्रीकर यांचा जन्म १९५५ मध्ये गोव्यातील म्हापसा येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण लोयोला हायस्कूलमध्ये झालं. १९७८ मध्ये त्यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली.

Manohar Parrikar | Sarkarnama

आयटीआय या देशातील अग्रगण्य संस्थेमधून पास होऊन राजकारणात आलेले मनोहर पर्रीकर हे देशातील पहिले आमदार आहेत.

Manohar Parrikar | Sarkarnama

मनोहर पर्रीकर 2000 ते 2002, 2002 ते 2005 आणि 2012 ते 2014 या काळात गोव्याचे मुख्यमंत्री होते. संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 14 मार्च 2017 रोजी चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले.

Manohar Parrikar | Sarkarnama

पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत असतांना देखील संसदीय कामकाजात पूर्णवेळ कार्यरत राहीले.

Manohar Parrikar | Sarkarnama

नोव्हेंबर 2014 मध्ये, मनोहर पर्रीकर मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री बनले. राज्यसभेतून त्यांनी संसदेत प्रवेश केला. ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याच्या तपासापासून ते सर्जिकल स्ट्राईकपर्यंत अनेक मोठी पावले त्यांनी उचलली.

Manohar Parrikar | Sarkarnama

साधेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि कार्यक्षम नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे पर्रीकर संरक्षण मंत्री म्हणून नेहमीच वेगळे राहिले.

Manohar Parrikar | Sarkarnama
CTA image | Sarkarnama