ममता बॅनर्जी : देशातील एकमेव विद्यमान महिला मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो

निवडणूकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 213 जागांवर आपले बहूमत सिद्ध करत विजयाचे रणशिंग फुंकले. तर भाजपला 77जागांवर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पक्षाचे शुभेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उभे होते.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

देशातील सर्वात हायव्होल्टेज फाईट समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल निवडणूकांमध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघावर संपुर्ण भारताचे लक्ष लागले होते.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

निवडणूकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालमधील तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप सह इतर पक्षांनी निवडणूकीचा जोरदार तयारी सुरु केली होती.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

निवडणूकांपुर्वी तृणमुल कॉंग्रेसचे शुभेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी ममता बॅनर्जीना धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी कोलकात्यात झाला. प्रचंड संघर्षातून त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

ममतादीदींनी माँ, माटी आणि मानुषचा नारा देत 2011च्या निवडणूकांमध्ये डाव्यांवर मात करत राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

देशात आतापर्यंत केवळ 14 महिलांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. मात्र काळाच्या ओघात त्या सर्वांनी सत्ता गमवावी लागली.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

दरम्यान, नंदीग्राम मतदार संघातून ममता बॅनर्जी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र निवडणूकांमधील तृणमुलच्या दणदणीत यशानंतर पक्षाने त्यांच्यात हातात मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली.

CM Mamata Banerjee | Sarkarnama

परंतू मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या ६ महिन्यांच्या आत ममता बॅनर्जी यांना इतर कोणत्याही जागेवरून आमदार होणे आहे. यासाठी त्या पोटनिवडणुकांसाठी भवानीपूर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Mamata Banerjee | Sarkarnama