Long March 2023: किसान सभेच्या लाँग मार्चचा तिसरा दिवस, लाल वादळ शमणार की तोडगा निघणार?

सरकारनामा ब्यूरो

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येऊन लाँग मार्च काढला आहे.

Long March | Sarkarnama

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते मुंबई असा भव्य पायी लाँग मार्च निघाला आहे.

Long March 2023 | Sarkarnama

आज (14 मार्च ) या लाँग मार्चचा तिसरा दिवस आहे.

Long March 2023 | Sarkarnama

शेतमालाचे पडलेले भाव, हक्काच्या वन जमिनी, दिवसा वीज या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Long March 2023 | Sarkarnama

नाशिक जिल्हातील दिंडोरी गावातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल निशाण हातात घेऊन हजारो आदिवासी बांधव पायी विधानभवनावर निघाले आहेत.

Long March 2023 | Sarkarnama

या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार जे. पी. गावित, अजित नवले, अशोक ढवळे आणि डॉ. डी. एल. कराड हे नेते करत आहेत.

Long March 2023 | Sarkarnama

लाँग मार्चच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाहीये.

Long March march | Sarkarnama

आता या प्रश्नांचे शिंदे- फडणवीस सरकार काय दखल घेते, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Long March march | Sarkarnama