Chandrababu Naidu News : सासऱ्याविरुद्ध बंड ते आंध्र प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री... पाहा फोटो...

Deepak Kulkarni

जन्म :

नारा चंद्रबाबू नायडू यांचा जन्म २० एप्रिल १९५० रोजी झाला आहे.

Chandrababu Naidu | Sarkarnama

तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष :

आंध्र प्रदेश राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री व तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आहेत.

Chandrababu Naidu | Sarkarnama

एन.टी. रामाराव यांचे जावई

प्रसिद्ध तेलुगू नट व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे ते जावई आहेत.

Chandrababu Naidu | Sarkarnama

सासऱ्यांविरुद्धच बंड...

नायडू यांनी १९९५ साली सासऱ्यांविरुद्धच बंड केले आणि ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.

Chandrababu Naidu | Sarkarnama

हैदराबादला माहिती तंत्रज्ञान केंद्र बनविण्यात मोठं योगदान :

हैदराबादला भारतामधील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.

Chandrababu Naidu | Sarkarnama

मोदी लाटेतही करिष्मा...

२०१४ साली आंध्रप्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर आणि मोदी लाटेतही विधानसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देसम पक्षाला १७५ पैकी १०२ जागा मिळाल्या.

Chandrababu Naidu | Sarkarnama

एनडीएतला एकेकाळचा महत्त्वाचा चेहरा

गुंतवणूकदारांना राज्यात आणण्यातला अव्वल नेता, भाजप प्रणित एनडीएतला एकेकाळचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा...

Chandrababu Naidu | Sarkarnama

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री..

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे सर्वाधिक काळ म्हणजेच १४ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत.

Chandrababu Naidu | Sarkarnama

...आणि २०१९ ला राज्यही वाचवू शकले नाहीत!

२०१९ ला मोदींना हरवण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू केले. पण मोदी तर सोडा, स्वतःचं राज्यही ते वाचवू शकले नाहीत.

Chandrababu Naidu | Sarkarnama

NEXT : भारताच्या परराष्ट्र धोरणात अमूलाग्र बदल घडविणारे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल