Leo Varadkar : आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान ; महाराष्ट्राशी आहे खास नातं!

सरकारनामा ब्यूरो

लिओ वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत.

Leo Varadkar | Sarkarnama

2017 ते 2020 पर्यंत ताओसेच (पीएम) आणि संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. 

लिओ वराडकर हे मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातल्या मालवण येथील वराड गावचे. याआधी ते 2019 मध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. 

Leo Varadkar | Sarkarnama

लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिन येथे झाला. डॉ. अशोक वराडकर हे 1960 ला इंग्लडला गेले. त्यांनी मिरियम या आयरिश मुलीसोबत लग्न केलं आणि तेथेच स्थायिक झाले.

Leo Varadkar | Sarkarnama

आई- वडीलांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेत. 2003 मध्ये त्यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून मेडिकलची पदवी घेतली.

आयर्लंडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

Leo Varadkar | Sarkarnama

आयर्लंडचे पंतप्रधान बनणारे लिओ वाडकर हे सर्वात तरुण नेते आहेत, त्यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

Leo Varadkar | Sarkarnama
Rhea Chakraborty Case: कोण आहे रिया चक्रवर्ती?