Anuradha Dhawade
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव हे नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असतात. असाच त्यांचा एक नवा किस्सा समोर आला आहे.
मंगळवारी तब्बल १० वर्षांनंतर लालू प्रसाद यादव आपल्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासोबत त्यांच्या मुळ गावी फुलवारिया येथे पोहचले.
त्यानंतर तिथून काही अंतरावर असलेल्या राबडी देवी यांच्या माहेरी म्हणजेच सेलार काला इथेही गेले होते.
सेलार कालात पोहचल्यानंतर जावई लालू प्रसाद आणि राबडी देवी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
गावातील काही महिला आल्या आणि राबडी देवी यांना घेऊन निघुनही गेल्या. पण लालू प्रसाद यादव मात्र गाडीतून उतरायला तयार नव्हते.
गावाकडे जावई रुसून बसण्याचे अनेक किस्से आपण ऐकतो, तसे लालू प्रसाद यादव देखील रुसून बसले
जोपर्यंत माझे मेहुणे मला घ्यायला येत नाही, तोपर्यत आपण काही गाडीतून उतरणार नाही, असा हट्टच धरून बसले
अखेर राबडी देवी यांचे चुलत भाऊ रमाकांत यादव गाडीजवळ पोहोचले आणि त्यांना घरात येण्याची विनंती केली.
त्यानंतर लालू प्रसाद यादव गाडीतून उतरले आणि सासुरवाडीच्या घरात गेले.