Dadaji Bhuse: शेतकरी ते कॅबीनेटमंत्री जाणून घ्या दादाजी भुसे यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

"प्रवाहा विरुद्ध राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता…" अशी ओळख असणाऱ्या दादाजी भुसे यांचा आज ( 6 मार्च ) वाढदिवस.

Dadaji Bhuse | Sarkarnama

काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात प्रस्थापित नेत्यांविरोधात संघर्ष करीत त्यांनी राजकारणात उडी घेतली. 

Dadaji Bhuse | Sarkarnama

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेला शिवसैनिक म्हणून त्यांनी गत सरकारमध्ये राज्यमंत्री तर आज कॅबीनेट मंत्रीपदी पदोन्नती मिळवून राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला.

Dadaji Bhuse | Sarkarnama

मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादाजी भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातले.

Dadaji Bhuse | Sarkarnama

प्रतिकुल स्थितीत तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करुन प्रवाहाविरुध्द राजकारणात उतरून काम केले.

Dadaji Bhuse | Sarkarnama

बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन सुरुवातीच्या काळात गावोगावी त्यांनी शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या. साधा शिवसैनिक ते तालुकाप्रमुख अशी मजलही त्यांनी मारली. 

Dadaji Bhuse | Sarkarnama