Anuradha Dhawade
UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत पास होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते पण काही निवडक लोकच पास होऊ शकतात.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये एक नाव आहे परी बिश्नोईचे, जिने आपल्या अथक परिश्रमानंतर या परीक्षेत यश मिळवले.
एका मुलाखतीत परी यांनी सांगितले होते, तिच्या आयएएस होण्यामागे तिच्या आई-वडिलांची मोठी भूमिका होती.
अजमेरची रहिवासी असलेली परी बिश्नोई यांचे, वडील मणिराम बिश्नोई वकील आहेत. तर आई सुशीला बिश्नोई अजमेरमध्ये जीआरपी पोलिस स्टेशन अधिकारी आहेत.
सध्या त्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच त्यांनी हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू भव्य बिश्नोई यांच्याशी साखरपुडा केला.
यूपीएससीत यश मिळवण्यासाठी परी सोशल मीडियापासून दूर राहिल्या. फोन वापरणे बंद करून रात्रंदिवस मेहनत करत त्यांनी हे स्थान मिळवले .