Anuradha Dhawade
माधवराव सिंधिया यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म १ जानेवारी १९७१ रोजी मुंबईत झाला
वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांची काँग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली
2002 मध्ये लोकसभा पोटनिवडणूक जिंकून ज्योतिरादित्य सिंधिया पहिल्यांदा खासदार झाले.
सिंधिया यांनी 2002, 2004, 2009 आणि 2014 पर्यंत सलग 4 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली.सिंधिया हे यूपीए-2 सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री होते.
2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष होते. पण 11 मार्च 2020 रोजी सिंधीया यांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाज मध्ये प्रवेश केला.
सिंधियासोबत, त्यांच्या 22 समर्थक आमदारांनीही काँग्रेस सोडली, ज्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि कमलनाथ यांनी शेवटी राजीनामा दिला.
मध्य प्रदेशातील ऐतिहासिक सत्तांतरानंतर सिंधीया यांचे नशीबच पालटले
6 जुलै रोजी ज्योतिरादित्य सिंधिया यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. आज ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत
7 जुलै 2021 हा दिवस सिंधिया यांच्यासाठी भाजपमध्ये सामील झाल्यानंतर सर्वात खास दिवस होता, कारण या दिवशी त्यांना मोदी सरकारमध्ये स्थान मिळाले.
सिंधिया यांच्याकडे नागरी विमान वाहतूक सारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
विशेष बाब म्हणजे ज्योतिरादित्य सिंधीया यांचे वडील माधवराव सिंधिया हे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री होते.