Anuradha Dhawade
शिवसेनेच्या नेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीl आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे सहभागी झाले होते.
या दोघांचा व्हिडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शीतल म्हात्रे शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत. बंडखोरी आधी त्या मूळ शिवसेनेत होत्या.
शिवसेना आमदारांच्या बंडानंतर त्यादेखील शिंदे गटात सामील झाल्या.
उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर 8 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडणूनही आल्या.
राजकारणात येण्यापूर्वी त्या पत्रकार म्हणून सक्रिय होत्या.
पत्रकारितेला रामराम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली.