Jayalalithaa: अभिनेत्री ते सहा वेळा मुख्यमंत्री; पाहा जयललिता यांचे कधीही न पाहिलेले फोटो!

सरकारनामा ब्यूरो

जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 ला झाला. त्या दोन वर्षाच्या असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

J. Jayalalithaa | Sarkarnama

जयललिता यांचा जन्म कर्नाटकातील मेलुरकोट गावात एका तामिळ कुटुंबात झाला.

J. Jayalalithaa | Sarkarnama

दक्षिण भारतात देवाप्रमाणे पूजल्या जाणार्‍या जयललिता या एकेकाळी तमिळ चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टार होत्या.

J. Jayalalithaa | Sarkarnama

जयललिता यांनी वयाच्या पंधरा व्या वर्षी कन्नड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या तामिळ चित्रपटांकडे वळाल्या.

J. Jayalalithaa | Sarkarnama

चित्रपटाच्या यशाच्या काळात त्यांनी 300 हून अधिक तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

J. Jayalalithaa | Sarkarnama

1965 ते 1972 या काळात त्यांनी 'एमजी रामचंद्रन' यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. त्या काळात 'एमजीआर' यांच्यासोबत त्यांची जोडी खूप गाजली.

J. Jayalalithaa | Sarkarnama

जयललिता यांनी 'एमजीआर' मुख्यमंत्री असतांना 1982 मध्ये सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.

J. Jayalalithaa | Sarkarnama

डिसेंबर 1987 मध्ये 'एमजीआर' यांचे निधन झाल्यानंतर जयललिता ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कळघम पक्षाकडून तामिळनाडूच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या बनल्या.

J. Jayalalithaa | Sarkarnama

दक्षिण भारतात त्या 'अम्मा' या नावाने लोकप्रिय होत्या.

J. Jayalalithaa | Sarkarnama

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतांना सुद्धा जयललिता यांच्या पक्षाने तामिळनाडूत 39 पैकी 37 जागा जिंकल्या होत्या.

J. Jayalalithaa | Sarkarnama

एक उत्कृष्ठ अभिनेत्री ते तामिळनाडूच्या सहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

J. Jayalalithaa | Sarkarnama

2016 मध्ये जयललिता यांनी 5 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

J. Jayalalithaa | Sarkarnama