Jagan Mohan Reddy Birthday : तुरुंगवास ते पदयात्रा, संघर्षाच्या जोरावर आज ते आहेत मुख्यमंत्री..

सरकारनामा ब्यूरो

आंध्र प्रदेशचे संपूर्ण राजकारण ज्या एका व्यक्तीभोवती फिरते ते वायएस जगनमोहन रेड्डी, यांचा आज वाढदिवस.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

जगनमोहन रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील जमलामादुगु येथे झाला.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

सप्टेंबर 2009 मध्ये माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर जगनमोहन यांनी त्यांच्या वडिलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या जागेवर काँग्रेस पक्षात दावा केला. 

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष आणि खच्चीकरण करण्यात आल्याने जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून 'वायएसआर काँग्रेस पार्टी ' या पक्षाची स्थापना केली.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत. 

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

वडिलांप्रमाणेच ‘प्रजा संकल्प पदयात्रे’च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत पक्षाची पायाभरणी करण्यात रेड्डी यांना यश आले आहे.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय यशात त्यांची पत्नी वाय एस भारती रेड्डी यांची साथ मिळाली आहे.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

वाय एस भारती रेड्डी या जगनमोहन यांच्या हैदराबादमधील भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि साक्षी मीडिया समूहाच्या अध्यक्ष आहेत.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

रेड्डी यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी १६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

पक्षबांधणीसाठी १४ महिन्यांत ३६४८ किमी अंतराची पदयात्रा, संघर्षाच्या जोरावर आज ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama