Children's Day 2021: पंडित नेहरुंविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Mangesh Mahale

पंडित नेहरु यांचे प्राथमिक शिक्षण अलाहाबाद येथे झाले. उच्च शिक्षण इंग्लड येथे, तर लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेतले.

पंडित नेहरुंना लहान मुलांविषयी खूप जिव्हाळा होता. मुलांमध्ये ते 'चाचा नेहरु' या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

पंडित नेहरू यांच्या पत्नीचे नाव कमला नेहरु होते. त्याची कन्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

महात्मा गांधी यांच्यासोबत पंडित नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना अनेक वेळा कारावास झाला. ते आधुनिक भारताचे निर्माते होते.

लाहौर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर रात्री बारा वाजता तिरंगा ध्वज फडकविला.

1919 मध्ये पंडित नेहरु हे पहिल्यांदा महात्मा गांधीजींना भेटले. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला.

१९१२ मध्ये ते कॉग्रेसमध्ये सहभागी झाले. १९२० मध्ये प्रतापगढ येथे झालेल्या शेतकरी मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केलं. १९३०मध्ये मिठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक करण्यात आली होती.