Indian Air force Day : 'नभं स्पृशं दीप्तम'

सरकारनामा ब्यूरो

८ ऑक्टोबर १९३२ रोजी औपचारिकरित्या या दलाची स्थापन झाली. या निमित्त अनेक चित्तथरारक कसरतींचे आयोजन करण्यात आले होते. ही छायाचित्रे तेथून घेण्यात आली आहेत.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

सुरवातीला राॅयल एअर फोर्स (RAF) असे दलाचे नाव होते.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

दुसऱ्या महायुद्धात या दलाने उत्तम कामगिरी केली. स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दल असे नामकरण झाले.

Indian air Force | Twitter/@Indian Air force

अनेक युद्धात या दलाने स्पृहनीय कामगिरी केली आहे. कागरिल संग्रामातील या दलाचा पराक्रम आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

दुसरे महायुद्ध, भारत-चीन युद्ध, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन विजय, कारगिल युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध, कांगो संकट अशा अनेक मोहिमांत हवाई दल सहभागी झाले होते.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

हवाई दलााचा ध्वज निळ्या रंगाचा आहे. मध्यभागी राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांचे बनलेले एक वर्तुळ आहे.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल असतात. या दलाची सूत्रे मूळचे महाराष्ट्राचे असलेले एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी नुकतीच स्वीकारली आहेत.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

भारतीय हवाई दलाकडे एकूण 1721 विमाने आहेत, ज्यात Su-30MKI, जग्वार, मिराज -2000, अपाचे आणि चिनूक यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच राफेल लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force

'नभं स्पृशं दीप्तम' हे भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य आहे. वैभवासह आकाशाला गवसणी घालणे, असा या वाक्याचा अर्थ होतो. हे संस्कृत सुभाषित गीतेतील ११ व्या अध्यायातून घेण्यात आले आहे.

Indian Air Force | Twitter/@Indian Air force