महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात, काय घडलं गेल्या सहा दिवसात

Anuradha Dhawade

विधान परिषद निवडणूकांचा निकाल लागला त्याच रात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतकडे रवाना झाले. एकनाथ शिंदेंसह जवळपास २० हून अधिक एका रात्रीत आमदार नॉटरिचेबल झाले.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड पुकारल्याचे उघडकीस आले. एकनाथ शिंदेसह आमदारांनी गुजरात येथील सुरतमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम केला. दोन दिवसात त्यांच्या गटात आणखी २० आमदार सामील झाले.बंडानंतर त्यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन तडकाफडकी काढण्यात आले.
बुधवारी (२२ जून) रात्री एकनाथ शिंदेंचा गट सुरतवरुन आसाममधील गुवाहाटीकडे रवाना झाले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भाजपचा पाठिंबा असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या
40 हून अधिक आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करण्याची भूमिका घेतली, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी, त्यांना परत बोलण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर बंडखोर आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील मुंबईत महाराष्ट्रात दाखल झाले
महाविकास सरकार पडण्याचे संकट महाराष्ट्रावर घोंगावू लागले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरले.
शिवसेनेतील बंडानंतर दूसरीकडे भाजपच्या गोटातील हालचालींना वेग, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत खलबतं वाढली. भाजपकडून राज्यपालांना विरोधी पक्षाकडून लक्ष घालण्यासाठी पत्र देण्यात आले
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. विधानसभा उपाध्यक्षांकडून बंडखोरांवर कारवाई कऱण्यासाठी त्यांच्यावर अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने त्यांच्या गटाचे नाव शिवसेना- बाळासाहेब ठाकरे असे ठेवले
गेल्या दोन दिवसांत बंडखोरांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली. केंद्र सरकारकडून बंडखोर आमदारांच्या कुटूंबियांना सुरक्षा पुरवण्यात आली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.