Bhagirath Bhalke : केसीआर यांनी ज्यांच्यासाठी विशेष विमान पाठवलं ते भालके आहेत तरी कोण?

Ganesh Thombare

भालके यांचे सुपुत्र

दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे भगीरथ भालके हे सुपुत्र आहेत.

'बीआरएस'च्या संपर्कात

भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे.

स्पेशल विमानाची चर्चा

भगीरथ भालके यांच्यासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी स्पेशल विमान पाठवल्याने मोठी चर्चा सुरू आहे.

तेलंगणाहून खास विमान

भगीरथ यांच्यासाठी तेलंगणाहून खास विमान आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होत आहे.

पोटनिवडणुकीत पराभव

2021 मध्ये झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव झाला.

राष्ट्रवादीला मोठा धक्का

भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये गेले तर पंढरपुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भगीरथ भालकेंची भूमिका काय?

भगीरथ भालके यांची पुढील भूमिका काय असेल? हे राव यांच्या भेटीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीच्या रिंगणात

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भालके हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Next: मिस वर्ल्डने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; पाहा खास फोटो !