Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी गमावलेले 'पक्षचिन्ह' शिवसेनेला कसे मिळाले होते?

Rashmi Mane

पक्षाची स्थापना

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना केली. 

Balasaheb Thackeray symbol of Shivsena | Sarkarnama

शिवसेनेची पायाभरणी

मराठी माणसांच्या न्याय व हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची पायाभरणी केली होती.

Balasaheb Thackeray symbol of Shivsena | Sarkarnama

राजकीय पक्ष म्हणून नोंदणी

बाळासाहेबांनी 1968 मध्ये शिवसेनेची 'राजकीय पक्ष' म्हणून नोंदणी करण्यात आली.

Balasaheb Thackeray symbol of Shivsena | Sarkarnama

शिवसेनेकडे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हते

शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाकडे 'धनुष्यबाण' हे चिन्ह नव्हते.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

पहिली निवडणूक

शिवसेनेने 1971 मध्ये ताडाचे झाड, ढाल, तलवार आणि रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हांवर पहिली निवडणूक लढवली होती.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण

1985 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला पहिल्यांदा 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह मिळाले. 

Balasaheb Thackeray | Sarkarnama

शिवसेनेचे खासदार संसदेत

'धनुष्यबाण' या चिन्हावर 1989 मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे चार खासदार विजयी होऊन संसदेत पोहोचले. त्यामुळे शिवसेनेसाठी धनुष्यबाण हे चिन्ह नेहमीच लकी ठरले.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

'सामना'ची स्थापना

1989 मध्ये शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना' सुरू केले आणि त्याच वर्षी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कायमचे मिळाले, तेव्हापासून शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवत आहे.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

News: राज ठाकरेंसाठी ९ नंबर का आहे लकी; पाहा काय आहे कारण ?