Anuradha Dhawade
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आप खासदार राघव चड्डा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या नात्याच्या चर्चा सुरु होत्या.
सुरुवातीला दोघांनीही त्यांच्या नात्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. पण अनेकदा दोघेजण मुंबईतील अनेक ठिकाणी एकमेकांसोबत दिसले होते.
अखेर शनिवारी (१३ मे) दिल्लीतील राघव चड्डा यांच्या निवासस्थानी कपूरथला हाऊस येथे राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा सभारंभ पार पडला.
त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटोज स्वत: राघव चड्डा यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
तर परिणीतीनेही आपल्या सोशल मिडीयावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत, 'मी ज्यांच्यासाठी प्रार्थना केली... मी हो म्हणाले...' अशी कॅप्शन दिली आहे.
या पोस्टवर परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचा एंगेजमेंट सोहळा पार पडला.
परिणीतीला त्यांच्या नात्याबद्दल विचारले असता तिने आपण राजकारणी व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे सांगितले होते.