Hasan Mushrif Birthday : कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात रमणारा नेता हसन मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो

राष्ट्रवादीतील बडे नेते, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारात दबदबा असणारे, मोदी लाटेतही आपला गड राखणारे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस.

Hasan Mushrif | Sarkarnama

हसन मुश्रीफ यांचा जन्म १९५४ मध्ये झाला. त्यांनी अर्थशास्त्रातून बी.ए.ची पदवी घेतली. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे.

Hasan Mushrif | Sarkarnama

मुश्रीफ विद्यार्थीदशेपासूनच चळवळीत सक्रिय होते. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. नंतर ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले.

Hasan Mushrif | Sarkarnama

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या मुश्रीफांकडे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचा सर्व कारभार आहे.

Hasan Mushrif | Sarkarnama

कागल विधानसभा मतदारसंघातून ते १९९९ पासून सलग पाचवेळा निवडून आले आहेत.

Hasan Mushrif | Sarkarnama

मुश्रीफ यांनी पशूसंवर्धन आणि दूग्ध विकास राज्यमंत्री, नगरविकास मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री ही जबाबदारी सांभाळली आहे.

Hasan Mushrif | Sarkarnama

मतदार संघात चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व नागरिकांना ते सतत प्रोत्साहन देतात.

Hasan Mushrif | Sarkarnama

सध्या मुश्रीफ यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

Hasan Mushrif | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींच्या आधीदेखील अनेकांची झाली होती आमदारकी- खासदारकी रद्द