Gujrat Election: काँग्रेसचे हे 'स्टार' नेते गुजरातमध्ये सांभाळणार प्रचाराची धुरा

सरकारनामा ब्युरो

2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 40 नेत्यांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही निवडणुकीत प्रचार करणार आहेत.

Gujrat election | Sarkarnama

या यादीमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाचाही समावेश आहे.

Gujrat election | Sarkarnama

या निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार देखील स्टार प्रचारकांच्या यादीत दिसणार आहे. जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याची जबाबदारी पक्षाने या नेत्यांवर दिली आहे.

Gujrat election | Sarkarnama

काँग्रेसचे युवा नेते जिग्नेश मेवाणी यांचाही या यादीत समावेश आहे. ते गुजरातमधील पक्षाच्या मुख्य नेत्यांपैकी एक आहेत.

Gujrat election | Sarkarnama

गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

Gujrat election | Sarkarnama

माजी मंत्री शिवाजीराव मोघे हेही प्रचार करतांना दिसतील.

Gujrat election | Sarkarnama

निवडणुकीत राहुल गांधी यांच्या सोबत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीही गुजरातच्या मैदानात उतरणार आहेत.

Gujrat election | Sarkarnama

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेही गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत.

Gujrat election | Sarkarnama

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचीही वर्णी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून लागली आहे.

Gujrat election | Sarkarnama

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

Gujrat election | Sarkarnama
Sarkarnama