Gujarat Election Results 2022 : मोदींना यश मिळवून देणारा 'हा' आहे मराठी चेहरा

सरकारनामा ब्यूरो

भारतीय जनता पक्षाची गुजरात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला, त्यामागे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कमाल आहे.

C. R. Patil | Sarkarnama

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली यंदाची गुजरात विधानसभा निवडणुक लढण्यात आली.

C R Patil | Sarkarnama

पाटील हे पंतप्रधान मोदीच्या अत्यंत जवळचे व विश्‍वासू व्यक्ती मानले जातात. त्यामुळे या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पाटील यांच्यावर होती.

C R Patil | Sarkarnama

सी. आर. पाटील (चंद्रकांत पाटील) हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रहिवासी होते. पण १९८५ च्या दरम्यान पाटील यांचे कुटुंब तळोद्यातून गुजरातला गेले.

C R Patil | Sarkarnama

सी.आर. पाटील सुरूवातीला गुजरात पोलिसांत भरती झाले. त्यांनतर नोकरीचा राजीनामा देत, त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. त्यानंतर पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांना मिळत गेल्या.

C R Patil | Sarkarnama

नवसारीतून ते सलग चौथ्यांदा खासदार झाले. दरवेळी ते आधीच्या मतांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून येतात हे त्यांची विशेष बाब आहे.

C R Patil | Sarkarnama

संसदेतील त्यांचे कार्यालय आदर्श आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य मानले जाते. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या संसदेतील कार्यालयाचे आणि कामाच्या पद्धतीचे कौतुक केले आहे.

C R Patil, Narendra Modi | Sarkarnama
Sarkarnama