Sunil Dhumal
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप-जनता दल (एस) अशी तिरंगी लढत होत आहे.
कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून सध्या राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.
दरम्यान, जेडीएस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (वय ६३) यांना आजारी असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.
कुमारस्वामी प्रचार करू शकत नसल्याने जेडीएसच्या प्रचाराची जबाबदारी पक्षाचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी घेतली आहे.
देवेगौडा यांचे वय ९० असून त्यांना चालताना त्रास होतो. स्टेजवर जाताना त्यांना सुरक्षारक्षकांच्या मदत घ्यावी लागते.
वयाची मर्यादा असतानाही देवेगौडा पक्षाच्या ४२ जागांसाठी प्रचार करणार आहेत.
"वयाच्या ९० व्या वर्षी प्रचार करत आहे. १० मे रोजी निवडणुका आहेत. त्यानुसार ८ मे च्या संध्याकाळपर्यंत काम करणार,” असे देवेगौडा यांना स्पष्ट केले.
प्रचाराचे काम करताना इंजेक्शनसाठी एक दिवस सुटी घेणार असल्याचेही देवेगौडा यांनी सांगितले आहे.