Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' लढती ठरल्या निर्णायक !

सरकारनामा ब्यूरो

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या काष्टी ग्रामपंचायतीत पॅनलने १७ पैकी १० जागावर विजय मिळवला आहे.

Babanrao Pachpute | Sarkarnama

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते पराभव केला आहे.

Sajan Pachpute | Sarkarnama

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून धैर्यशील माने यांना कागल गावातील सत्ता राखण्यात यश मिळाले आहे.

Dhairyasheel Mane | Sarkarnama

बीड तालुक्यातील नवगण राजूरीच्या संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या पॅनलचा पराभव करत नवगण राजूरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच बाजूने कौल दिला आहे.

Jaydutt Kshirsagar | Sarkarnama

सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यात 17 पैकी 14 ग्रामपंचायतींवर राणे गटाची सत्ता आली आहे.

Nitesh Rane | Sarkarnama

सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल यांना कौल दिला आहे.

Mahesh Shinde | Sarkarnama

जिल्हातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. 

Eknath Khadse | Sarkarnama

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींपैकी आत्तापर्यंत थोरात गटाने 25 जागांवर आपली सत्ता राखली आहे.

Balasaheb Thorat | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama