अभिनेत्री ते वादग्रस्त राजकारणी, कोण आहेत नवनीत कौर-राणा?

सरकारनामा ब्युरो

नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला. पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या नवनीत राणा यांचे वडील हे भारतीय लष्करात होते.

Navneet Rana

त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंग करायला सुरुवात केली. राजकारणात येण्यापूर्वी नवनीत राणा यांनी मॉडेलिंग आणि तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या.

Navneet Rana

अभिनय क्षेत्रात असताना त्यांनी सहा म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले. दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर सीनु वसंथी लक्ष्मी या तेलुगू चित्रपटासह काही मल्याळम चित्रपटातही आपले नशीब आजमावले.

Navneet Rana

मात्र, 2011 मध्ये अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले, आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. रवी राणा यांनी २१०० जोडप्यांसह सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

Navneet Rana |Ravi Rana

2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र या निवडणूकीत त्या पराभूत झाल्या

Navneet Rana

2019 च्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीच्या तिकीटावर स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navneet Rana