Neelam Reddy Birth Anniversary : तीन पंतप्रधानांसोबत काम करणारे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी; पाहा फोटो

Sunil Dhumal

जन्म

नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म 19 मे 1913 रोजी आंध्र प्रदेशातील इल्लूर गावात झाला.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

शिक्षण

नीलम संजीव रेड्डी यांचे शिक्षण मद्रासमधील थिओसॉफिकल हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी अनंतपूर येथील शासकीय कला महाविद्यालयातून पदवी घेतली.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

संविधान सभेचे सदस्य

नीलम संजीव रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून 1946 मध्ये मद्रास विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून काम केले. ते भारतीय संविधान सभेचे सदस्यही होते.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

पहिले मुख्यमंत्री

आंध्र प्रदेश राज्याची 1956 मध्ये निर्मिती झाली. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये नीलम संजीव रेड्डी आंध्रचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1962 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

रेड्डींचे कार्य

नीलम संजीव रेड्डी तीन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते तीनदा राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी केंद्रीय पोलाद आणि खाण मंत्री, वाहतूक, नागरी विमान वाहतूक, जहाजबांधणी आणि पर्यटन मंत्री म्हणूनही काम केले.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

तीन पंतप्रधानांसोबत काम

राष्ट्रपती म्हणून नीलम संजीव रेड्डी यांनी मोरारजी देसाई, चरण सिंग आणि इंदिरा गांधी या तीन पंतप्रधानांसोबत काम केले. 1982 मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

न्यूमोनियाने निधन

माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे 1996 मध्ये बेंगळुरूमध्ये वयाच्या 83 व्या वर्षी न्यूमोनियामुळे निधन झाले.

Neelam Sanjiv Reddy | Sarkarnama

NEXT : 'आयएएस' ते केंद्रीय कायदामंत्री; कोण आहेत अर्जुन राम मेघवाल ?