Gopinath Munde Memorial Day : शेतकऱ्याचा मुलगा ते केंद्रीय मंत्री; 'असा' आहे लोकनेत्याच्या थक्क करणारा प्रवास !

Sunil Balasaheb Dhumal

जन्म

मुंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील परळी येथे १२ डिसेंबर १९४९ रोजी शेतकरी कुटंबात झाला.

Gopinath Munde | Sarkarnama

शिक्षण

गावातील शाळेतच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. अंबेजोगाई येथील महाविद्यालयातून बी.कॉमनंतर त्यांनी पुण्यातील 'आयएलएस' महाविद्यालयात शिक्षण घेतले.

Gopinath Munde | Sarkarnama

महाजनांची भेट

कॉलेजमध्येच ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे ओढले गेले. तेथे त्यांना प्रमोद महाजन भेटले. तेथूनच मुंडे राजकारणात उतरले.

Gopinath Munde | Sarkarnama

राजकारणाची सुरूवात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला.

Gopinath Munde | Sarkarnama

'आरएसएस'चे पदाधिकारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही डझन शाखा सांभाळत ते संभाजीनगर मंडळ कार्यवाह बनले. भाजपमध्ये मुंडे भाजपच्या युवा शाखा महाराष्ट्र युनिट अध्यक्ष होते.

Gopinath Munde | Sarkarnama

शरद पवारांचे विरोधक

1994 मध्ये मुंडे यांनी महाराष्ट्रातील शरद पवार सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढली होती. त्यावेळी ते प्रकाश झोतात आले.

Gopinath Munde | Sarkarnama

विरोधी पक्षनेते

12 डिसेंबर 1991 ते 14 मार्च 1995 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

Gopinath Munde | Sarkarnama

उपमुख्यमंत्री

1995 मध्ये स्थापन झालेल्या मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.

Gopinath Munde | Sarkarnama

मोदी सरकारमध्ये मंत्री

मुंडेंनी पुन्हा 2014 मध्ये बीड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणून शपथ घेतली.

Gopinath Munde | Sarkarnama

दिल्लीत अपघात

3 जून 2014 रोजी पहाटे दिल्लीत मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Gopinath Munde | Sarkarnama

NEXT : 'पीएम' मोदींचा पारंपारिक लूक होतोय व्हायरल !