Lalu Prasad Yadav: 'ईडी'चा लालू प्रसाद यादवांना दणका; 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' काय आहे प्रकरण

सरकारनामा ब्यूरो

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या घरावर ईडीने काल (10 शुक्रवारी) कारवाई केली.

Lalu Prasad Yadav and Rabadi Devi | Sarkarnama

सक्तवसुली संचालनालयाने (ED) 'जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा' प्रकरणी मोठी छापेमारी केली आहे.

Enforcement directorate | Sarkarnama

दोनच दिवसांपूर्वी 'सीबीआय'च्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. 

Lalu Prasad Yadav with Daughter | Sarkarnama

दिवसेंदिवस 'लँड फॉर जॉब'च्या प्रकरणात यादव यांच्या अडचणी वाढत आहेत. 

Lalu Prasad Yadav with family | Sarkarnama

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यांनाही सीबीआयने समन्स पाठवले आहे.

Tejashwi Yadav | Sarkarnama

२००४ ते २००९ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. त्यांनी पदाचा गैरवापर करत १२ जणांना रेल्वेतमध्ये नोकरी दिली होती, असा आरोप ईडीने केला आहे. 

Lalu prasad Yadav | Sarkarnama

त्यापैकी सात जणांना जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे चौकशीत आढळले, असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

ED raid on Lalu Prasad Yadav house | Sarkarnama

'जमीनीच्या बदल्यात नोकरी' या गाजलेल्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराची ईडीने चौकशी केली.

ED raid on Lalu Prasad Yadav house | Sarkarnama