Sunil Dhumal
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या प्रचारादरम्यान बेंगळुरूत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
गांधी यांनी बेंगळुरू शहरासह कर्नाटक राज्यातील समस्यांवर चर्चा केली.
राहुल यांना चिमुकल्यासह मस्ती करण्याचा मोह आवरला नाही.
बंगळुरूतील विविध कंपन्यांच्या 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करणाऱ्यांची राहुल यांनी भेट घेतली.
राहुल गांधींनी 'डिलिव्हरी बॉय' यांच्यासोबत डोसा आणि कॉफी घेत चर्चा केली.
'डिलिव्हरी बॉय' यांना काम करताना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांनी 'डिलिव्हरी बॉय'च्या स्कूटरवर बसून फेरफटका मारला.