तुम्हाला माहितीये का, पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वात श्रीमंत का आहे?

अनुराधा धावडे

pimpri chinchwad municipal corporation

पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.

pimpri chinchwad municipal corporation

१९८२ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. या महापालिकेचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.

pimpri chinchwad municipal corporation

माई ढोरे या महापालिकेच्या महापौर होत्या. पण निवडणूका लांबल्याने महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील सध्या कारभार पाहत आहेत.

pimpri chinchwad municipal corporation

मार्च महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 6 हजार 497 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

pimpri chinchwad municipal corporation

2022-23 या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 961 कोटी 65 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

pimpri chinchwad municipal corporation

महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी 1 हजार 618 कोटी 68 लाख रुपये इतक्या भरीव रकमेची तरतूद या वर्षीच्या अंदाजपत्रकात केली आहे.

pimpri chinchwad municipal corporation

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरी गरिबांकरिता 1 हजार457 कोटी11 लाख रुपये, पाणीपुरवठा विशेषनिधीकरिता केलेली 200 कोटी रुपये, महिलांसाठी॑च्या विविध योजनांसाठी 45 कोटी रुपये अशा अनेक तरतुदी करण्यात अंदाजपत्रकात करण्यात आल्या आहेत.

pimpri chinchwad municipal corporation

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वात श्रीमंत असण्यामागचे एक कारण म्हणजे महापालिकेच्या ठेवी. येस बॅंकेत महापालिकेच्या जवळपास एक हजार कोटींच्या ठेवी आहेत, तर इतर बॅंकेत जवळपास चार हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यावर आठ टक्के दराने व्याज मिळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

pimpri chinchwad municipal corporation