Council Chamber building: हिमाचल प्रदेश विधानसभेचा रंजक इतिहास, माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

सिमला कौन्सिल चेंबरचा या वास्तुचा रंजक इतिहास आहे. 1925 ला दहा लाख रुपये खर्च करुन या इमारतीचे बांधकाम करण्यात आले.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

ही इमारत ब्रिटिश राजवटीची शेवटची महत्त्वाची इमारत होती. या इमारतीचे उद्घाटन 27 ऑगस्ट 1925 रोजी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते झाले.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

कौन्सिल चेंबर पहिल्या भारतीय स्पीकरच्या निवडणुकीचे साक्षीदार आहे. ब्रिटीश राजवटीत कौन्सिल चेंबरमध्ये एकूण १४५ सदस्यांची बसण्याची जागा होती.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

सिमला येथे ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या अनेक विंटेज इमारतींपैकी एक असलेल्या ऐतिहासिक चेंबरला सध्या हिमाचल प्रदेश विधानसभा म्हटले जाते.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

विधानसभा भवनातली सेंट्रल हॉलमधील सभापतींच्या खुर्चीचा इतिहासही रंजक आणि विशेष आहे.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

सिमल्यात केंद्रीय विधान परिषदेच्या बैठकांसाठी इमारत बांधण्यात आली तेव्हा तत्कालीन बर्मा सरकारने अध्यक्षांसाठी लाकडापासून बनवलेली खुर्ची भेट देण्यात आली.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

स्वातंत्र्यानंतर 1954 ते 1955 या काळात पंजाब विधानसभेचे अधिवेशनही याच इमारतीत पार पडले होते. पंजाबपासून वेगळे झाल्यानंतर या इमारतीमध्ये हिमाचल प्रदेशचे अधिकृत सचिवालय देखील होते.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

या ऐतिहासिक वास्तूत 1963 पासून हिमाचल प्रदेश विधानसभेची अधिवेशने सातत्याने होत आहेत.

Council Chamber building Himachal | Sarkarnama

सध्या हिमाचल प्रदेश विधानसभेची अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशने या ऐतिहासिक वास्तूत होतात. धर्मशाळेची विधानसभा इमारत हिवाळी अधिवेशनासाठीच वापरली जाते.

Council Chamber building Himachal | Sarkarnama