सरकारनामा ब्यूरो
महाराष्टाचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 या काळात उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.
सुंदरराव सोळंके यांनी १९७८-८० या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.
2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 या काळात रामराव आदिक यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.
गोपीनाथ मुंडे हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.
छगन भुजबळ यांनी १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपद भुषवले आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 या काळात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आर.आर. पाटील हे १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भुषवले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 ला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. फडणवीस हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत.