Anuradha Dhawade
रविंद्रनाथ टागोर यांचे छोटे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील सर्वात पहिले IAS अधिकारी होते हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा हा प्रवास किती खडतर होता.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अनेक वर्षांपूर्वी सत्येंद्रनाथ टागोर यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.
अनेक वर्षे भारतीयांना ब्रिटिश सरकारच्या उच्च पदांवर काम करण्याची परवानगी नव्हती.
1832 मध्ये त्यांनी प्रथमच भारतीयांना मुन्सिफ आणि सदर अमीन या पदांसाठी निवडण्याची परवानगी देण्यात आली.
1861 मध्ये भारतीय नागरी सेवा कायदा लागू करण्यात आला आणि भारतीयांना परीक्षा देण्याची परवानगी देऊन भारतीय नागरी सेवा स्थापन करण्यात आली
हा कायदा मंजूर झाल्यानंतर, टागोर यांनी त्यांचे मित्र मोनोमोहन घोष यांच्यासह परीक्षेची तयारी केली. इतकेच नव्हे तर लंडनला जाऊन पेपरही दिले.
प्रथम श्रेणी प्राप्त केल्यानंतर, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये निवड होऊन त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली.