Congress Leader Son Joins BJP : चर्चा तर होणारच ! काँग्रेस नेत्याच्या मुलाचा भाजप प्रवेश

सरकारनामा ब्युरो

अनिल अँटनी भाजपमध्ये

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Anil Antony | Sarkarnama

दिल्लीत स्वागत

दिल्ली येथे भाजप स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अँटनी यांचे स्वागत केले.

Anil Antony, Piyush Goyal | Sarkarnama

डॉक्युमेंटरीवरून मतभेद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंटरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी मतभेद झाले होते.

Anil Antony | Sarkarnama

सोशल मीडियाचे प्रमुख

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते.

Anil Antony | Sarkarnama

चुकीचा निर्णय

"मुलगा भाजपमध्ये गेल्याचे खूप दुःख आहे. त्याने चुकीचा निर्णय घेतला", असे ए. के. अँटनी म्हणाले.

Anil Antony | Sarkarnama

नाते पहिल्यासारखेच

"आमचे विचार वेगळे आहेत, मात्र आमच्यातील वडील-मुलाचे नाते पहिल्यासारखेच असेल", असे अनिल अँटनी म्हणाले.

Anil Antony | Sarkarnama

काँग्रेसवर टीका

भाजप देशासाठी काम करत आहे, तर काँग्रेस दोन-तीन व्यक्तींसाठी काम करणारा पक्ष असल्याची टीका अनिल अँटनी यांनी प्रवेशानंतर केली.

Anil Antony | Sarkarnama

NEXT : या आहेत भारतातील 'टॉप 9' श्रीमंत महिला