Digital Currency : 'डिजिटल रुपी' म्हणजे काय? सर्वसामान्यांना कसा होणार फायदा?

सरकारनामा ब्यूरो

आपण नोटा, नाणी हातात घेऊ शकतो. परंतु डिजिटल रुपी हे एक प्रकारचे व्हर्चुअल म्हणजे आभासी चलन आहे. मध्यवर्ती बँकेच्या या डिजिटल चलनाला (CBDC) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी  म्हणतात.

Sarkarnama

डिजिटल रुपी चलनाच्या माध्यमातून व्यवहार सहज सोप्या पद्धतीने होतील. 

Sarkarnama

डिजिटल रुपी हा एक प्रकारे चलनी नोटांचा डिजिटल अवतारच आहे. पण या डिजिटल रूपीचा वापर तुम्हाला केवळ ऑनलाईन स्टोरमध्येच करता येईल.

Sarkarnama

डिजिटल रुपी केवळ निवडक बँका आणि वित्तीय संस्थांना बँकांअंतर्गतच्या व्यवहारासाठी वापरता येईल.

Sarkarnama

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चा अर्थसंकल्प मांडतानाच भारत सरकार डिजिटल करन्सी आणणार असल्याची घोषणा केली होती.

Sarkarnama

डिजिटल रुपीचं मूल्य आपल्या नेहमीच्या रुपयाइतकंच आहे. म्हणजे एका रुपयाच्या मोबदल्यात तुम्ही एक डिजिटल रुपी विकत घेऊ शकता.

Sarkarnama

'आपण फोन काढतो, कोड स्कॅन करतो आणि झालं पेमेंट'. UPI, इंटरनेट बँकिंगचा वापर देशात वाढत चाललाय. आता यात डिजिटल रुपयाची भर पडणार आहे.

Sarkarnama

ज्यामुळे देशाच्या आर्थिक बळकटीला चालना मिळणार आहे.

Sarkarnama

तुम्ही या डिजिटल चलनाचा वापर करून कोणालाही पेमेंट करू शकता. CBDC खात्यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात परावर्तित होईल आणि चलनी नोटा देखील बदलले जाऊ शकतात.

Sarkarnama