Anuradha Dhawade
'ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरा यांचा आज (६ मे) राज्याभिषेक सोहळा पार पडला.
त्यांची पत्नी राणी कॅमिला यांचाही त्यांच्याबरोबर राज्याभिषेक करण्यात आला
ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
70 वर्षांनंतर राज्याभिषेकाचा योग
ब्रिटनच्या राजघराण्यात 70 वर्षांनंतर राज्याभिषेक सोहळा पार पडला. यापूर्वी 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता.
किंग चार्ल्स यांचा वयाच्या 74 व्या वर्षी राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झालेल्या वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमधील हे दृश्य आहे.
राजाचा ताफा ज्या मार्गावरून गेला त्या मार्गावर हजारो लोक उपस्थित होते. यावेळी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ब्रिटीश झेंडे फडकवण्यात आले.
या सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती. राजा चार्ल्स सोन्याचे पांढरे घोडे असलेल्या रथावर बसले होते.
वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये आर्चबिशप यांनी राजा चार्ल्स यांना शपथ दिली.
ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी पत्नी मेघनशिवाय वडिलांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. मात्र, या समारंभात त्यांची कोणतीही औपचारिक भूमिका नव्हती