Deepali Sayyed: अभिनेत्री ते राजकारणी, दीपाली सय्यद यांचा राजकीय प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

Sarkarnama Guest

दीपाली सय्यद यांचा जन्म 1 एप्रिल 1978 साली बिहारमध्ये झाला. बिहारच्या सीव्हीआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

Deepali sayyad | Sarkarnama

2006 साली सिनेसृष्टीतून त्यांच्या करिअरला सुरवात केली. लहानपणापासून त्यांना नृत्याची आवड होती. बंदिनी, समांतर या दीपाली सय्यद यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरूवातीच्या मालिका होत्या.

Deepali sayyad | Sarkarnama

त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका, जाहिराती तसेच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्या उत्तम नृत्यांगना आहेत. त्यामुळे अनेक रियालिटी शोमध्येही त्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसतात.

Deepali sayyad | Sarkarnama

दीपाली सय्यद यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात आम आदमी पक्षातून झाली. त्यांनी २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

Deepali sayyad | Sarkarnama

यानंतर काही दिवसांनी दीपाली सय्यद यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला होता. 

Deepali sayyad | Sarkarnama

३ ऑक्टोबर २०१९ ला रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Deepali sayyad | Sarkarnama

शिवसेनेत प्रवेश केल्यावर ठाणे जिल्ह्यातील कळवा- मुंब्रा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्यांचा प्रराभव झाला होता.

Deepali sayyad | Sarkarnama

"मला एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आणले, म्हणून मी त्यांच्या सोबत जात आहे", असे मत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.

Deepali Sayyed | Sarkarnama

येत्या काही दिवसात दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

Deepali sayyad | Sarkarnama

सिनेसृष्टीला राम राम करत, सध्या त्या पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहेत.

Deepali sayyad | Sarkarnama
Deepali Sayyed | Sarkarnama