दानिश सिद्दीकी : छायाचित्रांतून बोलणारा पत्रकार

अनुराधा धावडे

दिवंगत छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्यासह चार भारतीयांना 'फीचर फोटोग्राफी श्रेणी' मध्ये प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी अफगाणिस्तानातील युद्धाचे कव्हरेज करताना तालिबानी सैन्याने त्यांची हत्या केली. पुलित्झर पारितोषिक जिंकण्याची सिद्दीकी यांची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये देखील, दानिश सिद्दीकी यांना फीचर फोटोग्राफीसाठी पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे.

छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांनी जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली येथून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी २००७ मध्ये जामियाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून फोटो जर्नलिझमची पदवी घेतली.

दानिश सिद्दीकी यांनी अनेक वर्षे दिल्लीत प्रसिद्ध वृत्तसंस्थांमध्ये काम केले. सिद्दीकी यांनी पत्रकारितेची सुरुवात टेलिव्हिजनपासून सुरू केली. 2010 मध्ये इंटर्न म्हणून रॉयटर्समध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी काही काळ वार्ताहर म्हणून काम केले.

दानिश सिद्दीकी यांनी कोविड दरम्यान काढलेल्या छायाचित्रांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. दानिश सिद्दीकी यांना दुसऱ्यांदा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. 2018 मध्ये, रोहिंग्या निर्वासितांच्या संकटाशी संबंधित त्यांच्या छायाचित्रांसाठी रॉयटर्ससोबत काम करताना त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दानिश यांनी काढलेल्या छायाचित्रांची दिल्लीत बरीच चर्चा झाली. ज्यात लॉकडाऊनच्या काळात पायी चालत जाणाऱ्या कामगार, दिल्लीतील दंगलीदरम्यान धार्मिक कारणावरून दोन पक्षांमध्ये झालेला हिंसाचार, जामियाच्या विद्यार्थ्यांवर पिस्तुलातून गोळीबार करणारा युवक. हवाई सीमापुरी स्मशानभूमीत दानिशने घेतलेला फोटो हा लोकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरला.

दानिश सिद्दीकी यांनी अफगाणिस्तान आणि इराणमधील युद्धे, हाँगकाँगमधील निदर्शने, नेपाळमधील भूकंप अशा महत्त्वाच्या घटनांचे छायाचित्रण केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.